#मीटू : आलोकनाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई – जेष्ठ अभिनेते व ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून सर्वपरिचत असलेल्या आलोकनाथ यांच्यावर आज अखेर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. काहीच दिवसांपूर्वी प्रख्यात लेखिका विनीता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी मंगळवारी अखेर ओशिवरा पोलिसांनी त्यांच्याविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र अद्यापपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

मीटू मोहिमेतंर्गत विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. यानंतर अनेक अभिनेत्रींनींही आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तवणुकीचे आरोप केले होते. दरम्यान, आलोकनाथ यांनी सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. शिवाय विनिता नंदा यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)