मीटर काढल्याच्या रागातून वायरमनला मारहाण

 

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) – महावितरणचे थकीत बिल न भरल्याने घराचे वीज कनेक्‍शन तात्पुरते बंद करण्यासाठी गेलेल्या वायरमनला मीटर काढण्यास विरोध करत धक्काबुक्की केल्याप्रकरणी जिहे ता. सातारा येथील एकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सचिन दिलीप तावरे (वय 40) रा. जिहे ता. सातारा हे महावितरणच्या जिहे विभागात वायरमन म्हणून काम करत असल्याने त्यांनी त्याच गावातील सागर हणमंत बोरे याच्या घरातील वीज बिल न भरल्याने त्याची थकबाकी 1 हजार रूपये असल्याची त्याला कल्पना दिली होती. त्यानंतरही बोरे याने वीज बिल न भरल्याने तावरे हे बोरे याचे वीज कनेक्‍नशन तात्पुरते बंद करत त्याचा मिटर काढण्यासाठी गेले होते. दरम्यान, चिडलेल्या बोरे याने वायरमन तावरे यांना मीटर काढण्यास विरोध करत त्यांना धक्काबुक्की केल्याची तक्रार तावरे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)