कृष्णा वैद्य ठरली यावर्षीची ‘मिस पुणे’

कृष्णा वैद्य, काव्या जोशी व सिम्रन नाईक यांचे यश

पुणे – पुणे फेस्टीव्हलच्या वतीने आयोजित “मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धेत कृष्णा वैद्य यांनी प्रथम क्रमांक मिळवून मानाचा मुकूट मिळवला. तर, द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे काव्या जोशी व सिम्रन नाईक यांना मिळाला. यावेळी विजेत्यांचा सत्कार फेस्टिवलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बेस्ट स्माईल म्हणून सानिया चौधरी, बेस्ट हेअरचा मान रुची हेंद्रे, बेस्ट फिटनेस मॉडेल म्हणून पूजा मिरारी, मिस फेवरेटचा मान स्नेहल खोमणे आणि मिस फोटोजेनिक म्हणून सृष्टी गव्हांडे यांची निवड करण्यात आली.

त्यांचा सत्कार प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी, युनायटेड नेशन्स ग्लोबच्या डॉ. राधिका वाघ आणि संयोजिका सुप्रिया ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, मॉडेल अभ्यंग कुवळेकर, मोहन टिल्लू, श्रावणक्‍वीन तन्वी माने, दिग्दर्शक देवेंद्र शिंदे, दिग्दर्शक प्रशांत गिरकर उपस्थित होते. या संपूर्ण स्पर्धेचे शो डिरेक्‍टर, फॅशन कोरिओग्राफी व ग्रूमिंग मेंटॉर म्हणून जुई सुहास यांनी काम पाहिले.

गेली 6 वर्षे सुरू असणाऱ्या या स्पर्धेत यावर्षी 18 ते 25 वर्षे वयोगटातील 100 युवतींनी सहभाग घेतला होता. त्यातील 10 युवतींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर रॅम्प वॉक आणि परिक्षकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्‍नानंतर मिस पुणे फेस्टिवल आणि रनर अप यांची निवड करण्यात आली. यावेळी परीक्षक म्हणून मॉडेल विवेक पवार, डीवा पॅजंट कोच अंजना मस्करेनाझ, फॅशन फोटोग्राफर मोहन रानडे, आंतरराष्ट्रीय डिझायनर शलाका पंडित आणि टॉप मॉडेल यश राणा यांनी काम पहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

2 COMMENTS

  1. नमस्कार, या बातमीत नाव चुकविली आहेत, माझी मुलगी काव्या जोशी ही फर्स्ट रनर अप म्हणून आली आहे , तिचे नाव कवीया ज्योती असे छापले आहे, तरी तिचे नाव दुरुस्त्री करून ही बातमी पुन्हा द्यावी ही विनंति.

    प्रसाद जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)