मिसिंग लिंकचा खर्च अठराशे कोटींनी वाढला

एका वर्षात खर्चात वाढ : 6 हजार 695 कोटींचा खर्च येणार


मुंबई-पुणे द्रुतगती महार्गावर दोन बोगदे, दोन व्हाया डक्‍टसह 8 पदरी नविन रस्ता

-Ads-

पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गातील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील 12 कि.मी.च्या राहिलेल्या लांबीसाठी दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह 8 पदरी नविन रस्ता (मिसिंग लिंक) बांधण्यात येणार आहे. या कामासाठी नोव्हेंबर 2017 मध्ये शासनाने 4 हजार 797 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. आता अवघ्या एका वर्षात या मिसिंग लिंकच्या कामासाठी लागणाऱ्या खर्चात तब्बल 1 हजार 898 कोटी रुपयांनी वाढ झाली असून या प्रकल्पासाठी 6 हजार 695 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

मुंबई-पुणे हा महामार्ग हा 95 कि.मी लांबीचा असून सहा पदरी आहे. यामधील खोपोली एक्‍झीट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील राहिलेल्या 12 कि.मी लांबीचे काम द्रुतगती मार्ग बांधतेवेळी पर्यावरण विषयक बाबींमुळे हाती घेण्यात आले नव्हते. या लांबीत द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 यांच्या मार्गिका सामायिक असल्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या राहिलेल्या लांबीचे (मिसींग लिंक) बांधकाम करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या द्रुतगती महामार्गावरील खालापूर फुडमॉल ते खोपोली इंटरचेंज दरम्यान आठ पदरी उन्नतमार्ग बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्वत: निधी उभारून आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा मागवून अंमलबजावणी करण्यासही शासनाने मान्यता दिली होती. या कामासाठी 4 हजार 797 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मागील वर्षी यास शासनाने मान्यता दिली. आता शासनाने निविदेनुसार येणाऱ्या प्रकल्पाची सुधारीत किंमत 6 हजार 695 कोटी इतक्‍या रकमेस शासनाने मान्यता दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)