मिसिंग’च्या तपासासाठी लाच घेणाऱ्या शिपायाला अटक

यवत- दौंड पोलीस ठाण्याच्या पोलिस शिपायाने मिसिंगच्या तपासासाठी तक्रारदारकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज (दि. 29) दुपारी दौंड तालुक्‍यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना परिसरात करण्यात आली. बापू नामदेव रोटे (वय 40, रा. दौंड) असे पोलीस शिपायाचे नाव आहे. तक्रारदारांची बहीण दोन महिन्यांपूर्वी हरवली या प्रकारची नोंद दौंड पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस शिपाई बापू रोटे यांच्याकडे आहे. लाच प्रकरण तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या कार्यालयात नोंदवली होती. रोटे आज पाटस येथे साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या बंदोबस्तासाठी ड्युटीवर होता. एसीबीच्या पथकाने आज दुपारी सापळा रचून रोटे यास लाच स्वीकारताना पकडण्यात आले. रोटे याच्यावर रात्री उशिरापर्यंत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)