मिशेलला अन्य व्यवहारांमधूनही पैसे मिळाले

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेला दलाल ख्रिश्‍चियन मिशेल याला संरक्षण खरेदीच्या अन्य व्यवहारांमधूनही पैसे मिळाले आहेत. त्याबाबतचा तपास होणे बाकी आहे, असे सक्‍तवसुली संचलनालयाए शनिवारी दिल्लीच्या न्यायालयात सांगितले. मिशेलला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्या कोठडीची मुदत वाढवली.

मिशेलला ऑगस्टा वेस्टलॅन्ड खरेदी व्यवहारामध्ये 24.25 दशलक्ष युरो आणि 1,60,96,245 पौंड इतकी रक्कम मिळाली असल्याची माहिती “ईडी’ने आज न्यायालयात दिली. मिशेलच्या चौकशीदरम्यान त्याला अन्य व्यवहारांमधूनही दलाली मिळाल्याचे उघड झाले आहे. याची चौकशी “ईडी’कडून केली जाईल, असे “ईडी’चे विशेष सरकारी वकील डी.पी. सिंह आणि एन.के.मट्टा यांनी न्यायालयात सांगितले. मिशेलने हा रक्कम देशाबाहेर मालमत्ता खरेदीसाठी हवालाच्या माध्यमातून पाठवली असल्याचेही न्यायालयात सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिशेलला देण्यात आलेली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज संपल्याने त्याला हजर करण्यात आले होते. मिशेल ब्रिटीश नागरिक आहे. तसेच भारतात त्याचे भारतात काहीही संबंध नाहीत. त्यामुळे तो पळून जाण्याची शक्‍यताही “ईडी’ने वर्तवली. त्यामुळे न्यायालयाने मिशेलच्या कोठडीत 26 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)