मिशेलने केली होती राफेल कराराविरोधातही लॉबिंग 

नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून लोकसभेत राफेल करारावरून घमासान चालू असतानाच एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेला ख्रिश्‍चियन मिशेलला राफेल करार होऊ द्यायचा नव्हता. त्याऐवजी युरोफायटर टायफूनची निवड व्हावी, यासाठी मिशेल जोरदार लॉबिंग करत होता.

२००७ मध्ये भारताकडून १२६ एमएमआरसीए फायटर विमानांच्या खरेदीसाठी आरएफपी काढण्यात आली. त्यावेळी राफेलसह ५  विमाने स्पर्धेत होते. परंतु. कडक परीक्षणानंतर २०११ मध्ये केवळ दसॉल्ट राफेल आणि युरोफायटर टायफून ही दोन विमाने स्पर्धेत राहिली. यामध्ये राफेलची निवड झाली. परंतु, ख्रिश्‍चियन मिशेल युरोफायटर टायफून लावत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका इंग्रजी माध्यमाच्या वृत्तानुसार, गुड्डो हश्चेके याच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारीत सापडलेल्या कागदपत्रावरून राफेलविषयक माहिती समोर आली. यानुसार  युरोफायटर टायफून निवड होण्यासाठी ख्रिश्‍चियन मिशेल आणि गुड्डो हश्चेके लॉबिंग करत होते. तसेच राजकारणी नेताव्यतिरिक्त हवाई दलाचे चीफ ऑफ एयर कमांड, एयर ऑफिसर मेंटेनेंस आणि चीफ ऑफ इंजीनियरिंग यांच्याकडे लोम्बीन करावे लागेल,असा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये आहे.

दरम्यान, बुधवारी लोकसभेमध्ये राफेल मुद्यावरून जोरदार चर्चा चालू असताना विरोधी पक्षाचे काही सदस्य कागदी विमाने उडवत होते. यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी युरोफायटरच्या स्मरणार्थ ही विमान उडवली जात असल्याचा टोला लगावला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)