बेंगळुरू – अमेरिकेतील मिशिगन राज्याने गुरुदेव श्री श्री रवि शंकर ह्यांच्या प्रति विशेष आदर व्यक्त करीत, त्यांच्या नावे 7 जुलै हा दिवस दरवर्षी ‘श्री श्री रवि शंकर दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. लक्षावधी लोकांना योग आणि ध्यानाद्वारे जीवनात आनंद फुलविण्याच्या कार्याप्रति आदर व्यक्त करीत डेट्रॉईटच्या महापौरांनी ही घोषणा केली. अमेरिका आणि कॅनडाच्या पंचवीसहून अधिक शहरे यामध्ये सहभागी झाली आहेत.

डेट्रॉईटचे महापौर मायकेल डुग्गन यांनी याबाबत घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. ‘जगभरातील जन समुदायाच्या जीवनात आनंद फुलविण्याप्रति संकल्पबद्ध असलेले’ श्री श्री रविशंकर ह्यांनी स्थापन केलेल्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आणि “मानवीय मूल्यांकरिता आंतरराष्ट्रीय संघटन’ ह्या संघटनांचे जाहीर आभार व्यक्त करण्यास सामील व्हावे.असे आवाहन त्यांनी आपल्या शहरातील लोकांना आवाहन केले आहे. श्री श्री रविशंकर ह्यांनी तणावमुक्त व हिंसामुक्त समाज तयार करण्यासाठी अभूतपूर्व चळवळीचे नेतृत्व केले. त्याप्रति विशेष आदर मिशिगन राज्याद्वारे व्यक्त केला गेला आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या सन्मानाप्रति त्यांना तीन देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालेला आहे. जगभरातील विविध शासनांकडून त्यांना 35 हुन अधिक सन्मानपत्रे व पुरस्कार प्राप्त झाले आहेत, तसेच त्यांच्या वैश्विक मानवीय कार्याची दखल घेत 15 हुन अधिक मानद डॉक्‍टरेट दिल्या गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)