मिळकतकर न भरणे पडले बाराच्या भावात

– 7/12 उताऱ्यावर बोजा चढवला, 45 लाख रुपये थकले

पुणे – महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन कार्यालयामार्फत मिळकतकराची थकबाकी न भरणाऱ्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहेच, परंतु दोन थकबाकीदाराच्या एकूण 117.50 गुंठे मालमत्तेवर बोजा चढवून सातबारा उताऱ्यावर महापालिकेने नोंद केली आहे.

जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल आणि सोपान गणपत येवले अशी थकबाकीदारांची नावे आहेत. त्यांच्याकडे एकूण मूळ बाकी 44 लाख 76 हजार 337 रुपये आहे. तसेच या थकबाकीवर दंड लावून तो बोजा दोघांच्याही सातबाऱ्यावर चढवण्यात आला आहे. ही एकूण जागा 117.50 गुंठे म्हणजेच एक लाख 26 हजार 430 चौ. फुट आहे.

येवलेवाडी येथील सर्व्हे नं. 10/1 येथील सोपान गणपत येवले आणि इतर यांच्या जागेचे कुलमुखत्यारपत्र मे. अलकॉन ग्रुप तर्फे जगदीश प्रसाद तिलकचंद अगरवाल यांच्य मालकीच्या मोकळ्या भूखंडावर महापालिकेची वरील नमूद बाकी होती. वारंवार नोटीसा देऊनही त्यांनी ती भरली नाही. त्यामुळे सातबारावर बोजा चढवण्याची कारवाई महापालिकेच्या कर आकारणी – करसंकलन प्रमुख विलास कानडे यांनी ती कारवाई केली.

महापालिकेने यासाठी पाच विशेष पथके तयार केली असून, 26 नोव्हेंबरपासून 311 मिळकतींसमोर बॅण्ड वाजवण्यात आला. 10 मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, तीन कोटी 67 लाख 26 हजार 620 रुपये वसूल करण्यात आले. तसेच एक कोटी तीन लाख 97 हजार 644 रुपये इतकी थकबाकी असलेल्या मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यापुढे कर न भरणाऱ्या संस्था, मोकळे भूखंड यांच्यावर सातबारा उताऱ्यावर बोजा चढवणे, जप्तीची कारवाई करणे सुरूच राहणार असल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)