“मिळकतकर अभय योजना पुन्हा राबवा’

पुणे – शहरातील मिळकतधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकबाकी आहे. त्यामुळे त्याच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा मिळकतकर अभय योजना राबवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक ऍड. भैय्यासाहेब जाधव यांनी स्थायी समितीत दिला आहे. दरम्यान, महापालिकेकडील मिळकतकर थकबाकीचा आकडा तब्बल 2400 कोटींवर गेला असून त्यात दरवर्षी 24 टक्के वाढ होत आहे.

शहरातील अनेक मिळकतकरधारकांना पालिकेच्या चुकीने अथवा त्यांच्या चुकीने मिळकतकर भरलेला नाही. अशा मिळकतकरावर तीन पट दंड आकारला जात असून एकूण दंडावर व्याजाची रक्कम वर्षाला जवळपास 24 टक्के होते. त्यामुळे हा थकबाकीचा आकडा फुगतच आहे.

मात्र, अनेक नागरिकांना हा कर भरायचा असल्याने त्यांच्याकडून पालिकेकडे विचारणाही केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी तसेच अनावश्‍यक थकबाकी कमी व्हावी यासाठी प्रशासनाने मिळकतकर अभय योजना पुन्हा राबवावी अशी मागणी ऍड. जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)