मिळकतकराने ओलांडला 100 कोटींचा टप्पा

मागील वर्षीच्या तुलनेत 30 कोटी जादा उत्पन्न


आतापर्यंत 75 टक्के बिलांचे वाटप पूर्ण

पुणे- महापालिका मिळकतकर विभागास आर्थिक वर्षाच्या पहिल्या 12 तब्बल 100 कोटी कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी याच 12 दिवसांमध्ये महापालिकेस 72 कोटींचे उत्पन्न मिळाले होते.

यावर्षी कर बिलांचे तब्बल 75 टक्के वाटप पूर्ण झाले असल्याने तसेच नागरिकांना कर भरण्यासाठी महापालिकेकडून मेसेज तसेच ई-मेलद्वारे आवाहन केले जात आहे. तसेच ऑनलाइन कर भरण्यासाठी वेगवेगळया सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर भरला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. सुमारे 1 लाख 19 हजार मिळकतधारकांनी हा कर भरला आहे.

शहरातील नियमित कर भरणाऱ्या तब्बल 5 लाख 55 हजार मिळकतकरधारकांना महापालिकेकडून मार्च महिन्यातच 2018-19 या आर्थिक वर्षाची बिले पाठविण्यात आली आहेत. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 3 लाख 9 हजार मिळकतधारकांना बिले पाठविण्यात आली आहेत. यातील सुमारे 75 टक्के बिलांचे वाटप पूर्ण झालेले असल्याने नागारिकांकडून मेपूर्वी दिल्या जाणाऱ्या कर सवलतीचा लाभ घेत कर भरण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. 31 मेपर्यंत कर भरणाऱ्या मिळकतकरधारकांना 25 हजार रुपयांपर्यंत 5 टक्के तर त्यापुढील रकमेवर सर्वसाधारण करात 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी केले आहे.

महापालिकेकडे 12 दिवसांत सुमारे 1 लाख 19 मिळकतधारकांनी कर जमा केला असून त्यातील सर्वाधिक 64 हजार 459 मिळकतींच्या कराची सुमारे 56 कोटी 69 लाख रूपये रक्कम ऑनलाइन सुविधेद्वारे जमा झाली आहे. तर 29 हजार 731 मिळकतधारकांनी सुमारे 15 4 कोटी 73 लाख रूपयांचा रोख रकमेचा करभरणा केला असून 21 हजार 636 मिळकतधारकांनी 31 कोटी 18 लाख रूपयांचा मिळकतकर धनादेशाद्वारे पालिकेकडे जमा केलेला आहे.

सुटीदिवशीही करभरणा केंद्र सुरू
जास्तीत जास्त नागरिकांनी 31 मे पूर्वी महापालिकेस कर जमा करावा, यासाठी महापालिकेची कर भरणा केंद्र सुटीदिवशीही सुरू राहणार आहेत. मात्र, 14 एप्रिल रोजी ही केंद्र बंद राहणार असून परवा (रविवारी) नागरिकांना महापालिकेच्या कर संकलन केंद्रावर कर जमा करता येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)