मिलेनियम स्कूल, राजीव साबळे फाउंडेशन, बीव्हीबी संघांची आगेकूच कायम

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा

पुणेमिलेनियम स्कूल, राजीव साबळे फाउंडेशन, बीव्हीबी, पवार स्पोर्टस अकादमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना येथे सुरु असलेल्या सखाराम मोरे क्रीडा अकादमी व आर्य क्रीडोद्धारक मंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात मिलेनियम स्कूल संघाने मुंबई बॉईज संघाला 25-13, 25-11 असे पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली आहे. मिलेनियम संघाकडून विपुल कदम, कहान दांडेकर, ओम बांगडे, वेद गोडबोले यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबई बॉईज संघाकडून अंकित शाह, जिनय गोसर, आर्यन गोडा यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

17 वर्षांखालील मुलांच्या लढतीत पवार स्पोर्टस अकादमी संघाने राजीव साबळे फाउंडेशन बी संघाला 25-3, 25-6 असे एकतर्फी पराभूत केले. पवार स्पोर्टस अकादमी संघाकडून प्रतीक चांदगुडे, रामकृष्ण शितोळे, प्रतीक परभने, पृथ्वीराज चव्हाण यांनी संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. राजीव साबळे फाउंडेशन संघाकडून आशिष डोंबे, स्वराज लांडगे, ऋग्वेद माहुरकर यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

17 वर्षांखालील मुलींच्या लढतीत बीव्हीबी संघाने एसपीएम स्कूल संघाला 25-9, 25-9 असे पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. बीव्हीबी संघाकडून श्रद्धा रावल, ऐश्वर्या जोशी, अनिशा नाईक, आश्‍लेषा कर्णिक यांनी संघाला विजय मिळवून दिला. एसपीएम स्कूल संघाकडून तनया जोशी, नेहल प्रभुणे, इशा गोखले, अनुष्का पवार यांनी चांगली लढत दिली.

14 वर्षांखालील मुलांच्या गटात झालेल्या अन्य लढतीत अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशन संघाने क्रीडावर्धिनी संघाला 25-17, 25-15 असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशन संघाकडून अविष्कार धुमाळ, अथर्व पवार, अनुराग मालुसरे, साहिल राउत यांनी संघाला विजय मिळवून दिला. अमर शिवरकर, आदित्य नेवसे, गिरीश खोपडे यांना क्रीडावर्धिनी संघाचा पराभव टाळता आला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)