मिलींद एकबोटे यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी

पुणे – भीमा कोरेगाव दंगली प्रकरणात अटक करण्यात आलेले मिलींद एकबोटे यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. याविरोधात एकबोटे यांच्या कुटूंबियांनी पोलिसात तक्रार दिली आहे. एकबोटे यांच्यावर या आधीही न्यायालय परिसरात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.

एका अज्ञात व्यक्तीने मिलिंद एकबोटे यांच्या घरी हे  धमकीचं पत्र पाठवलं असून, त्या  पत्रात एकबोटेंना अटक केलेल्या बातम्यांची कात्रने  आणि त्याखाली “संपूर्ण एकबोटे परिवाराला तोफेच्या तोंडी द्या आणि मारून टाका ”, अशा आशयाचा संदेश लिहीला आहे. दरम्यान जीवे मारण्याची धमकी आल्यानं पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी एकबोटेंच्या कुटूंबियांनी केली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)