सातारा – माहिती व जनसंपर्क विभागामार्फत काढण्यात येणाऱ्या लोकराज्य अंकामध्ये मिलिटरी अपशिंगे जिल्हा परिषदेच्या शाळेचा “स्मार्ट शाळेची गोष्ट’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. यामुळे आमच्या शाळेचे नाव राज्यपातळीवर गेले आहे. लोकराज्य अंकामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येते. या योजनांचा लाभ घेऊन आम्ही आमच्या गावाचा विकास करु त्यासाठी आम्ही मिलिटरी अपशिंगे हे गाव लोकराज्य ग्राम करणार आहोत, असे आश्वासन आज ग्रामस्थांनी दिले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेला माहे फेब्रुवारी 2019 च्या महाराष्ट्र ग्रीटेक प्रकल्प अंकाचे प्रकाशन आज मिलटरी अपशिंगे जिल्हा परिषदेत शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांच्या हस्ते आज करण्यात आले.
मिलिटरी अपशिंगे येथील जिल्हा परिषद शाळेवरील स्मार्ट शाळेची गोष्ट, सुरक्षित कागदपत्रे-सुरक्षित समाज, गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार, स्वच्छता हीच सेवा, नवे तंत्रगतिमान विकास, शेती विकासाचा डिजीटल अध्याय यासह अन्य विषयांवर या अंकामध्ये माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, गावच्या सरपंच सारिका गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका जमेला बागवान, संजय निकम, अजित निकम, पांडूरंग पवार, दिपक नलगे, संजय जाधव, दिनकर निकम, अमृत जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवराज पाटील म्हणाले, लोकराज्य मासिकात मिलटरी अपशिंगे शाळेचा लेख प्रसिद्ध झाला असून आता तुमच्या शाळेला भेटी देणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. येथील शिक्षकांची व ग्रामस्थांची आणखीन जबाबदारी वाढली असून शाळेची गुणवत्ता यापुढेही टिकवून ठेवली पाहिजे. मिलिटरी अपशिंगे ही शाळा इतर शाळेना दिशादर्शक ठरेल विश्वास व्यक्त करुन मिलिटरी अपशिंगे हे गाव जिल्ह्यातील पहिले लोकराज्य ग्राम व्हावे यासाठी ग्रामस्थांनी पुढकार घ्यावा.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा