मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली – मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला असून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांना हटवण्यात आले आहे. मात्र संजय निरुपम यांना आजच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.

अंतर्गत गटबाजी वरून मुंबई काँग्रेसमध्ये सतत चढाओढ चालू असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. त्यातच संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून काही नेत्यांचा विरोध त्यांना होता. त्यामुळे याचे नुकसान आगामी लोकसभा निवडणुकीत होऊ नये याची खबरदारी घेत काँग्रेस पक्षाने मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची निवड केली असल्याचे समजत आहे.

मिलिंद देवरा हे दिवगंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे सुपूत्र असून दक्षिण मुंबई हा त्यांचा मतदारसंघ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)