पुणे- शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनी झालेल्या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणात समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (61, रा. शिवाजीनगर) यांच्या जामीन अर्जावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. गुरूवारी (दि.19 एप्रिल) विशेष न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या न्यायालयात जामिनावर सुनावणी होणार अहे.
1 जानेवारी 2018 रोजी शौर्य दिनानिमित्त वंदन करण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारो आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथे आले होते. त्यावेळी कोरेगाव भिमा गावच्या हद्दीत उसळलेल्या दंगलीमध्ये दगडफेक, जाळपोळीची घटना झाली. यामध्ये 92 दुचाकी, 92 चारचाकी वाहने, चार रिक्षा, 14 टॅम्पो, दुकाने, हॉटेल्स सरकारी, खासगी वाहनांची तोडफोड झाली होती. त्यामध्ये सर्व मिळून सुमारे 5 कोटी 94 लाखाचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. ऍट्रॉसिटी कलमानुसर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात एकबोटे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणात त्यांनी जामीन मिळविला आहे. त्यानंतर पोलिसांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 307, 332, 353, 435, 436, 427, 336, 337, 143, 145, 146, 147, 148, 149, 160, 454, 461, 380, 333 तसेच 120 (ब) सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम 3 व 4, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 135, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम 7 अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल गुन्ह्यात एकबोटे यांना अटक केली आहे. यामध्ये एकबोटे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बचाव पक्षातर्फे ऍड. एस.के.जैन आणि ऍड. अमोल डांगे यांनी त्यांच्या जामिसाठी अर्ज केला होता. यावर सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार, बचाव पक्षातर्फे ऍड. एस.के.जैन, ऍड. अमोल डांगे आणि साक्षीदाराच्या वतीने ऍड. तौसिफ शेख, ऍड. कुमार कलेल यांनी काम पाहिले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा