मिलिंद एकबोंटे यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

तर दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पुणे- समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर शिवाजीनगर न्यायालयात शाईफेक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी संजय हरिदास वाघमोरे (वय 31, रा. अप्पर बिबवेवाडी) याच्या पोलीस कोठडीत एक दिवस वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तर उर्वरित दोघांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.

विठ्ठल अशोक खाडे (वय 23, रा. कात्रज) आणि अवदेश श्रीलालजी यादव (वय 27, रा. प्रियदर्शनी चाळ, अपर, इंदिरानगर) अशी न्यायालयीन कोठडी झालेल्यांची नावे आहेत. सोमवारी (दि. 19 मार्च) दुपारी 3.15 च्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयात ही घटना घडली होती. शिरूर तालुक्‍यातील भीमा कोरेगाव प्रकरणात पोलिसांनी एकबोटे यांना अटक केली आहे. न्यायालयने पोलीस कोठडीत वाढ केल्याने पोलीस एकबोटे यांना घेऊन चालले होते. त्यावेळी त्यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलीस तिघांना घेऊन जात होते. त्यावेळी मुख्य आरोपी संजय याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.

त्याच्याकडे तपास करता आलेला नाही. त्यामुळे त्याच्यासह तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. तर बचाव पक्षातर्फे ऍड. बी.ए.आलुर, ऍड. रणजित ढोमसे पाटील आणि ऍड. अकुश जाधव यांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तीवाद न्यायालयात केला. मात्र, न्यायालयाने संजय याच्या पोलीस कोठडीत वाढ केली. तर उर्वरित दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या दोघांच्या जामिनासाठी बचाव पक्षातर्फे ऍड. बी.ए.आलुर यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
4 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)