मिलिंद आणि अंकिताचे आज लग्न? लग्नस्थळाचे फोटो व्हायरल

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेण्ड अंकिता कोवर यांच्या ब्रेकअपची चर्चा असताना, आता अलिबागला त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच लग्नास्थळाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काही फोटो सजावटीचे असून काही फोटोंमध्ये हातावर मेहंदी लावलेली अंकिता मिलिंद सोमणसोबत पोझ देताना दिसत आहे. दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकही उपस्थित असल्याचं फोटोंवरुन दिसत आहेत. या दोघांचे आजच लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मिलिंद सोमण आणि अंकिता कोवर यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लॉटरी लागल्यामुळे 27 वर्षांच्या अंकिता कोवरने मिलिंद सोमणला रामराम केल्याची चर्चा रंगली होती. परंतु अंकिता आणि मिलिंदने आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन दोघांमध्ये सगळं आलबेल असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे ब्रेकअपची फक्त अफवा असल्याचे समोर आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)