मिलमनचा फेडररवर सनसनाटी विजय

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 
न्यूयॉर्क- पाच वेळचा माजी विजेता आणि यंदाही विजेतेपदाचा दावेदार असलेल्या रॉजर फेडररला पुरुष एकेरीच्या चौथ्याच फेरीत धक्‍कादायक पराभव पत्करावा लागल्यामुळे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा आठवा दिवस खळबळजनक ठरला. विश्‍वक्रमवारीत 55व्या स्थानावर असलेल्या जॉन मिलमनने द्वितीय मानांकित फेडररचे आव्हान चार सेटच्या झुंजीनंतर संपुष्टात आणताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विजयासह पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.
विशेष म्हणजे जॉन मिलमनने कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली होती. आणि पहिल्याच प्रयत्नांत फेडररसारख्या दिग्गज खेळाडूला पराभूत करताना मिलमनने इतिहासात स्थान मिळविले. फेडररने पहिला सेट सहज जिंकून जोरदार प्रारंभ केला होता. या वेळी फेडरर पराभूत होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. परंतु मिलमनने आश्‍चर्यकारकरीत्या पुनरागमन करताना पुढचे तीनही सेट सलग जिंकत 3-6, 7-5, 7-6 (9-7), 7-6 (7-3) अशी बाजी मारताना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.
त्यातही दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये तर फेडररकडे सेट पॉइंट होते. परंतु दोन्ही वेळा फेडररच्या हुकमी सर्व्हिसने त्याला दगा दिला आणि तब्बल 77 नाहक चुकांचा आगळा विक्रम करताना फेडररने आपल्याच पराभवाला हातभार लावला. फेडररसाठी 2013 नंतर अमेरिकन ओपन स्पर्धेतील हा सर्वात लवकरच्या फेरीतील पराभव ठरला. त्या वेळी टॉमी रॉब्रेडोने फेडररला चौथ्याच फेरीत पराभूत करून खळबळ उडविली होती. फेडररला मी पराभूत केले आहे, यावर माझाचा अद्याप विश्‍वास बसलेला नाही, असे सांगून मिलमन म्हणाला की, एक खेळाडू म्हणून फेडररचे कर्तृत्व आणि त्याने टेनिसबद्दल केलेले कार्य याबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे. किंबहुना फेडरर हा माझा हीरोच आहे. फेडररने आज निश्‍चितच त्याचा सर्वोत्तम खेळ केला नाही. परंतु मी हा विजय नम्रपणे स्वीकारतो.
पुरुष एकेरीतील तिसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत अग्रमानांकित राफेल नदालसमोर आता ऑस्ट्रियाच्या नवव्या मानांकित डॉमिनिक थिएमचे आव्हान आहे. यंदाच्या वर्षात नदालला पराभूत करणाऱ्या केवळ तीन खेळाडूंपैकी थिएम हा एक आहे. थिएमने माद्रिद स्पर्धेत नदालला क्‍ले कोर्टवर पराभूत करताना सनसनाटी निकालाची नोंद केली होती. चौथ्या उपान्त्यपूर्व लढतीत तृतीय मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रोसमोर अमेरिकेच्या 11 व्या मानांकित जॉन इस्नरचे आव्हान आहे.
आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)