मिरा रोड : रुग्णाचा मृत्यू; वोक्‍हार्ट रुग्णालयात नातेवाईकांचा धुडगुस 

ठाणे – मुंबईतील जेजे रुग्णालयात डॉक्‍टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाणीची घटना ताजी असताना मिरा रोडमधील वोक्‍हार्ट रुग्णालयात पुन्हा रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे. हृदयविकाराने ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत रुग्णालयाची तोडफोड केली. मिरा रोडमध्ये राहाणारे सय्यद इशान हैदर रिझवी यांना रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्‍यामुळे ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. मात्र 40 मिनिटांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

रुग्णाच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी रुग्णालयातील डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांशी बाचाबाची केली. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये तोडफोड सुरु केली. पोलिसांनी तातडीने दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. रुग्णालयाच्या तक्रारीनंतर नया नगर पोलीस पुढील तपास करत असून वोक्‍हार्ट रुग्णालयाला पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)