मिरा एरडाचा डब्ल्यु सिरीजच्या एलिट ड्रायव्हर्सच्या यादीत समावेश

नवी दिल्ली: भारताची आघाडीची महिला रेसर मिरा एरडा ही इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली असून पुढील वर्षी होणाऱ्या डब्ल्यु सिरीजसाठीच्या 50 एलिट ड्रायव्हर्सच्या यादीत तिचा समावेश करण्यात आला आहे. आयोजकांनी बुधवारी याची माहिती दिली.

जगातील एकमात्र महिला रेसिंग स्पर्धा असलेल्या या स्पर्धेसाठी 30 वेगवेगळ्या देशातून स्पर्धक येतात त्यामध्ये ती सर्वाची कमी वयाची रेसर आहे. ट्रायल्सनंतर अंतिम 18 जणांची निवड करण्यात येते. मे 2019 पासून या रेसिंग स्पर्धेची सुरुवात होते. जेके टायर एफएमएससीआय नॅशनल रेसिंग अजिंक्‍यपद स्पर्धेतील युरो जे के गटात 2017 साली मिराने चमक दाखवली होती. मिरासोबतच स्नेहा शर्मा ही एलजीबी-4 गटात सहभागी होते. तिला देखील 100 जणांच्या यादीत संधी मिळाली असल्याने यंदा दोन भारतीय महिला रेसर यात सहभागी होनार आहेत. डब्ल्यु सिरीजमध्ये एकूण 1.5 मिलियनचे बक्षीस देण्यात येते. यासोबतच पाच लाख डॉलर्सचे देखिल वेगळी बक्षिसे मिळणार आहेत.

-Ads-

या हंगामातील पहिली स्पर्धा जर्मनीच्या हॉकेनहिम येथे 3 मे ला होणार आहे. जगातील महिला रेसर्सना आपले कौशल्य दाखवता यावे यादृष्टीने डब्ल्यु सिरिजची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच या गटात चांगले कौशल्य पहायला मिळण्याची अपेक्षा आहे असे डेव्हिड काऊल्थार्ड म्हणाले. वडोदराच्या मिराने आपल्या प्रवासाला राष्ट्रीय कार्टिंगपासून सुरुवात केली. त्यानंतर तिने एलजीबी फॉर्म्युला 4 मध्ये सहभाग नोंदवला. 2017 साली तिने फॉर्म्युला 4 रूकी चॅम्पियन ऑफ द ईयरचा किताब मिळवला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)