मिरजेत गणेश मिरवणूकीत भाजप – राष्ट्रवादीत तुंबळ हाणामारी; 10 जण जखमी

सांगली – सांगलीच्या मिरजेत गणेश मिरवणूकी दरम्यान दोन गटांत तुफान राडा झाला आहे. यात 10 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या अभिजित हारगे व भाजपच्या महादेव कुरणे गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. हा प्रकार गणेश मिरवणूकी दरम्यान महापालिका निवडणूकीतील वाद उफाळून आल्याने घडला आहे.

मिरवणूकीमध्ये पुढे जाण्याच्या कारणातून हारगे आणि कुरणे गटात तुंबळ हाणामारी झाली. बसवेश्वर चौकात घरगुती गणपती मिरवणूकीने जात असताना कुरणे गटातील कार्यकर्ते या मिरवणूकी समोर नाचत होते. तर याचवेळी मागून पुढे चाललेला हारगे गट समोर आल्याने दोन्ही गटात वादावादीला सुरवात झाली आणि या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात काठ्या, गजांनी एकमेकांना मारहाण केली. तसेच तुफान दगडफेकही केली. यामध्ये दोन्ही गटाचे 10 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तर याठिकाणी असणाऱ्या अनेक वाहनांचे नुकसान झाले.

यानंतर दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता याठिकाणी दोन्ही गटाच्या महिला कार्यकर्त्यांमध्येही जोरदार वादावादीचा प्रकार घडला. उशिरापर्यंत दोन्ही गटांकडून परस्पर फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील बसवेश्वर चौकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)