मिरजगावमध्ये रोडरोमिओची धुलाई अन्‌ “रास्ता- रोको’

रोडरोमिओच्या छळामुळे अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा विचार
मिरजगाव – रोडरोमिओकडून होणाऱ्या सततच्या छळामुळे अल्पवयीन मुलगी चिठ्ठी लिहून आत्महत्येच्या विचारात असतानाच आईने प्रसंगावधानता दाखविल्याने तिचा जीव वाचला. या प्रकारामुळे संप्तत झालेल्या ग्रामस्थांनी रोडरोमिओची धुलाई केली.तसेच कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर पोलीस चौकीसमोरच अर्धा तास “रास्ता-रोको’ केला.
हा रोडरोमिओ येथील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची येण्या-जाण्याच्या मार्गावर पाठलाग करून छेडछाड करीत होता. याबाबत घरी सांगितल्यास शाळा बंद होईल, या भीतीने या मुलीने हा प्रकार घरी सांगितला नाही. हा प्रकार असह्य झाल्याने बुधवारी मध्यरात्री या मुलीने चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची मानसिक तयारी केली. पण एवढ्या रात्री आपली मुलगी काय करतेय?असे लक्षात आल्यानंतर तिच्याजवळ जाऊन विचारपूस केली. तेव्हा खरा प्रकार समोर आला. गुरूवारी पालकांनी याबाबत पोलिसात व शाळेत तक्रार दिल्यानंतर ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यातूनच शहरातील तरूणांनी रोडरोमिओला चांगला चोप देऊन शहरातून धिंड काढून पोलिसांच्या हवाली केले. या घटनेमुळे अनेक पालक पोलीस चौकीजवळ जमा झाले. वारंवार होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्यासाठी पोलीस चौकीसमोरच पालक, ग्रामस्थांनी दुपारी नगर-सोलापूर महामार्ग अर्धा तास रोखून धरला. यावेळी अनेकांनी अशा प्रवृत्तींना वेळीच आळा न घातल्यास कोपर्डीची पुनर्रावृत्ती होऊ शकते. येत्या आठ दिवसांत याबाबत ठोस कारवाई न केल्यास तालुका बंद ठेवण्यात येईल, असा इशारा देत रास्तारोको मागे घेण्यात आला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)