मिरची पूड टाकून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न

पिंपरी – मिरची पूड तोंडावर टाकून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणारास वाकड पोलिसांनी लक्ष्मणसिंग सुरजसिंग बायस ठाकुर (वय 40, रा. सुदर्शन कॉलनी, पिंपळे-निलख) यांस अटक केली. या प्रकरणी 70 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता फिर्यादी महिला डांगे चौक, काळेवाडी येथील कुणाल पान स्टोअर्समध्ये बसल्या असताना आरोपी तिथे आला. त्याच्याकडील कागदाची पूडी उघडून त्यातील मिरचीची लाल पावडर महिलेच्या तोंडावर टाकली व त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेने विरोध केल्याने मंगळसूत्र पान टपरीतच पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. आर. स्वामी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)