मियामी ओपन टेनिस स्पर्धा; नाओमीचा सेरेनावर खळबळजनक विजय

मियामी – इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील विजेत्या नाओमी ओसाकाने आपली विजयी घोडदौड चालू ठेवताना सेरेना विल्यम्सवर 6-3, 6-2 असा एकतर्फी विजय मिळवताना मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. अन्य लढतींमध्ये ऍलिझ कॉर्नेट, व्हिक्‍टोरिया आझारेन्का व एकाटेरीना माकारोव्हा या अव्वल खेळाडूंनी आगेकूच केली.

मियामी ओपनचा पहिलाच सामना सेरेना आणि आपले पहिलेवहिले विजेतेपद प्राप्त केलेली नाओमी यांच्यात झाला. हा सामना रंगतदार होईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. परंतु ओसाकाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेरेनावर हल्ला चढवला आणि केवळ 87 मिनिटांत हा सामना संपवत सेरेनावर सनसनाटी विजय मिळवला.

सेरेना 21 वर्षांमध्ये प्रथमच पहिल्या फेरीत बाद झाली असून 13 महिन्यांच्या विश्रांतीनंतर हा तिचा चौथा सामना होता. सेरेनाच्या विश्रांतीमुळे तिला या स्पर्धेत मानांकन देण्यात आले नव्हते. सेरेनाने पुनरागमनानंतर चार सामन्यांमधील दोन सामने गमावले असून इंडियन वेल्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत तिला थोरली बहीण व्हीनस विल्यम्सकडून पराभवाचा धक्‍का बसला होता. नाओमीने पहिल्यापासून सेरेनाविरुद्ध आक्रमक धोरण अवलंबले. त्यामुळे सेरेना पहिल्यांदाच काहीशी बचावात्मक खेळताना दिसली. दबावाखाली असलेल्या सेरेनाला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीही संधी नाओमीने मिळू दिली नाही आणि हा सामना सरळ सेटमध्ये संपविला.

तर या स्पर्धेतील इतर महत्वाच्या सामन्यांमध्ये ऍलिझ कॉर्नेटने बेथॅनी मेटॅक-सॅंड्‌सवर 6-2, 7-5 असा विजय मिळवला. तर व्हिक्‍टोरिया आझारेन्काने सी.सी.बेलिसवर 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात झरीन डियासने जेनिफर ब्रॅडीवर 7-5, 7-6 (10-8) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. तर एकाटेरीना माकारोव्हाने तिमिया बेकिन्स्कीवर 2-6, 6-2, 4-6 अशी तीन सेटमध्ये मात केली. आणखी एका सामन्यात व्हार्व्हरा लेपचेन्कोने व्हिक्‍टोरिजा गोल्युबिकवर 6-4, 5-7, 7-5 असा संघर्षपूर्ण विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)