मियामी ओपन टेनिस स्पर्धा; जॉन इस्नर व ऍलेक्‍झांडर झ्वेरेव्ह यांच्यात अंतिम लढत रंगणार

मियामी -पुरुषांच्या एकेरीत युआन डेल पोट्रो विरुद्ध जॉन इस्नर व ऍलेक्‍झांडर झ्वेरेव्ह विरुद्ध पाब्लो कॅरेनो बस्टा यांच्यात उपान्त्य फेरीत लढत झाली. या लढती मध्ये 14 वे मानांकन असणाऱ्या जॉन इस्नरने युआन डेल पोट्रोचा 6-1, 7-6(2) असा सरळ सेट मध्ये पराभव केला तर चतुर्थ मनांकीत ऍलेक्‍झांडर झ्वेरेव्हने 16 वे मानांकन असणाऱ्या पाब्लो कॅरेनो बस्टाचा 7-6(4), 6-2 असा पराभव करत अंतीम फेरीत धडक मारली. अंतीम फेरीत जॉन इस्नर व ऍलेक्‍झांडर झ्वेरेव्ह यांच्यात लढत होणार आहे.

युआन डेल पोट्रो विरुद्ध जॉन इस्नर यांच्यातील सामन्यात जॉनने सामन्यात सुरुवाती पासुनच डेल पोट्रोवर हल्ला चढवला. त्या मुळे पहिल्याच सेट मध्ये दबावात येत पोट्रोने चुका केल्या. जॉनने पोट्रोची सर्वीस भेदताना पोट्रोला सामन्यात कोणतीच संधी मिळू दिली नाही त्या मुळे पोट्रोने पहिला सेट 6-1 असा गमावला. पहिला सेट गमावल्या नंतर दुसऱ्या सेट मध्ये पोट्रोने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला परंतू दुसऱ्या सेट मध्येही जॉनने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करताना दुसरा सेट 7-6(2) असा जिंकत सामना आपल्या नावे करत अंतीम फेरीत धडक मारली.

तर दुसऱ्या उपान्त्य सामन्यात ऍलेक्‍झांडर झ्वेरेव्हने 16 वे मानांकन असणाऱ्या पाब्लो कॅरेनो बस्टाचा सलग दोन सेट मध्ये पराभव करत अंतीम फेरीत धडक मारली. सामन्यातील पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी वर्चस्व गाजवण्या साठी प्रयत्न केले परंतू चतुर्थ मानांकन प्राप्त ऍलेक्‍झांडर झ्वेरेव्हने 16 वे मानांकन असणाऱ्या पाब्लो कॅरेनो बस्टाचा 7-6(4), 6-2 असा पराभव केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)