मियामी ओपन टेनिस स्पर्धा; डॅनिएली कॉलिन्सचा व्हीनसवर सनसनाटी विजय

मियामी – ऑस्ट्रेलियाच्या डॅनिएली कॉलिन्सने आठव्या मानांकित व्हीनस विल्यम्सवर सनसनाटी मात करताना मियामी ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. बिगरमानांकित डॅनिएली कॉलिन्सने व्हीनस विल्यम्सचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विजयाची नोंद केली.

कॉलिन्ससमोर उपान्त्य फेरीत सहाव्या मानांकित येलेना ऑस्टापेन्कोचे आव्हान आहे. आणखी एका उपान्त्यपूर्व सामन्यात ऑस्टापेन्कोने चतुर्थ मानांकित एलेना स्विटोलिनाचा कडवा प्रतिकार 7-6, 7-6 असा संपुष्टात आणताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. दुसऱ्या उपान्त्य लढतीत अमेरिकेच्या 13व्या मानांकित स्लोन स्टीफन्ससमोर स्टीफन्सने व्हिक्‍टोरिया आझारेन्काचे आव्हान आहे.

स्लोन स्टीफन्सने जर्मनीच्या 10व्या मानांकित अँजेलिक कर्बरला सरळ सेटमध्ये पराभूत करताना महिला एकेरी विश्‍वक्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. तसेच बिगरमानांकित व्हिक्‍टोरिया आझारेन्काने पाचव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हावर झुंजार विजय मिळवीत आगेकूच केली.

महिला दुहेरीत एलेना व्हेस्निना व एकेटेरिना माकारोव्हा या अग्रमानांकित जोडीसह कॅटरिना सिनियाकोव्हा व बार्बरा क्रॅजिचेक या सहाव्या मानांकित जोडीने उपान्त्य फेरी गाठली. तसेच डेमी स्कर्स व एलिसे मेर्टेन्स आणि ऍश्‍ले बार्टी व कोको वान्डेवेघे या बिगरमानांकित जोड्यांनीही उपान्त्य फेरी गाठली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)