मियामी ओपन टेनिस स्पर्धा; स्टीफन्स-आझारेन्का उपान्त्य लढत रंगणार

      स्लोन स्टीफन्सची “टॉप-10’मध्ये धडक

मियामी – अमेरिकेच्या 13व्या मानांकित स्लोन स्टीफन्सने जर्मनीच्या 10व्या मानांकित अँजेलिक कर्बरचे आव्हान 6-1, 6-2 असे सरळ सेटमध्ये मोडून काढताना मियामी ओपन टेनिस स्पर्धेत प्रथमच महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. परंतु हा विजय स्टीफन्ससाठी दुहेरी सेलेब्रेशनचा ठरला. एक तर तिने व्हिक्‍टोरिया आझारेन्काविरुद्धच्या उपान्त्य लढतीची निश्‍चिती केली आणि दुसरे म्हणजे या विजयामुळे स्टीफन्सने महिला एकेरी विश्‍वक्रमवारीत पुन्हा एकदा टॉप-10 क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे.

बिगरमानांकित व्हिक्‍टोरिया आझारेन्काने पाचव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा प्रतिकार 7-5, 6-3 असा संपुष्टात आणताना सनसनाटी निकालासह उपान्त्य फेरी गाठली. तिसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत चतुर्थ मानांकित एलेना स्विटोलिना विरुद्ध सहावी मानांकित येलेना ऑस्टापेन्को यांच्यात सामना रंगेल. तर अखेरच्या उपान्त्यपूर्व सामन्यात आठव्या मानांकित व्हीनस विल्यम्ससमोर मोनिका पुईगवर तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण मात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या डॅनिएली कॉलिन्सचे कडवे आव्हान आहे.

महिला दुहेरीत एलेना व्हेस्निना व एकेटेरिना माकारोव्हा या अग्रमानांकित जोडीनेही लुडमिला किचेनोक व ऍला कुद्रत्सेव्हा या जोडीचा प्रतिकार 6-2, 6-4 असा संपुष्टात आणताना उपान्त्य फेरीत धडक मारली. तसेच कॅटरिना सिनियाकोव्हा व बार्बरा क्रॅजिचेक या सहाव्या मानांकित जोडीने हयुंग चॅन व यिंग चॅन या द्वितीय मानांकित जोडीवर 2-6, 6-4, 13-11 अशी प्रदीर्घ झुंजीनंतर खळबळजनक मात करताना उपान्त्य फेरी गाठली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)