मियामी ओपन टेनिस स्पर्धा; वोझ्नियाकी, ओसाका यांना पराभवाचा धक्‍का

मियामी – विश्‍वक्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर वोझ्नियाकीवर संघर्षपूर्ण विजय मिळवत बिगरमानांकित मोनिका प्युगने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. व्हीनस विल्यम्सने नतालिया विख्ल्यांतसेवावर मात केली. अन्य सामन्यात पेट्रा मेट्रिकने 15वे मानांकन असणाऱ्या क्रिस्टिना लाडेनोव्हिकला हरवत खळबळ उडवून दिली. चौथे मानांकन असलेल्या एलिना स्विटोलिनाने नाओमी ओसाकाचा पराभव करत ओसाकाची विजयी घोडदौड रोखली. इतर महत्वाच्या सामन्यांमध्ये जेलेना ऑस्टापेन्को, पेट्रा क्‍विटोवा, डॅनियल रोज कॉलिन्स, सोफिया केनीन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आगेकूच केली.

मियामी ओपनच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये अनेक उलटफेर पाहावयास मिळाले ज्यात वोझ्नियाकीला मोनिका प्युग या बिगरमानांकित खेळाडूने झुंज देत 0-6, 6-4, 6-4 असे हरवले. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये वोझ्नियाकीने मोनिकाला कोणतीच संधी मिळू दिली नाही त्यामुळे हा सामना वोझ्नियाकी एकतर्फी जिंकेल असे वाटत असतानाच मोनिकाने सामन्यात पुनरागमन करताना वोझ्नियाकीला धक्‍का दिला. मोनिकाने वोझ्नियाकीवर हल्ला चढवताना दुसरा सेट 6-4 असा आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमधील मोनिकाच्या आक्रमणामुळे दडपणात आलेल्या वोझ्नियाकीने तिसरा सेट देखील 6-4 असा गमावत सामना गमावला.

आठव्या मानांकित व्हीनस विल्यम्सने बिगरमानांकित नतालिया विख्ल्यांतसेवावर 7-5, 6-4 अशी मात करत स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सामन्यामध्ये सुरुवातीला नतालियाने व्हीनसवर आक्रमण करत पहिले पाच गेम आपल्या नावे केले होते तेंव्हा ती व्हीनसवर 2-5 अशी आघाडीवर होती परंतु व्हीनसने सामन्यात पुनरागमन करत नतालियावर आघाडी घेत पहिला सेट 7-5 असा आपल्या नावे केला. पहिल्या सेटनंतर आपला धडाकेबाज खेळ चालू ठेवत व्हीनसने दुसऱ्या सेटसह सामना आपल्या नावे केला.

तर तिसऱ्या सामन्यात एकापेक्षा एक मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्‍का देत इंडियन वेल्सचे विजेतेपद पटकावनाऱ्या नाओमी ओसाकाला जागतिक टेनिस मानांकनात चतुर्थ स्थानी असणाऱ्या एलिना स्विटोलिनाने पराभवाचा धक्‍का दिला. या पराभवाने नाओमीचे सलग दुसरे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच एलिनाही नाओमीवर वरचढ ठरली. तिने हा सामना 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये जिंकत नाओमीची स्वप्नवत घोडदौड रोखली.
तर इतर महत्त्वाच्या सामन्यांमध्ये जेलेना ओस्टापेन्कोने तिमिया बाबोसला 6-4, 6-4 अशे हरवत पुढील फेरीत आपले स्थान निश्‍चित केले.

तर पेट्रा क्‍विटोवाने अरीना सबालेंकावर 7-5, 3-6, 6-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. तर डॅनियल रोज कॉलिन्स या बिगरमानांकित खेळाडूने सोळावे मानांकन असणाऱ्या कोको वांडेवेघेचा 6-3, 1-6, 6-1 असा पराभव करत स्पर्धेत खळबळ उडवून दिली. सोफिया केनिनने एकोणीसावे मानांकन असणाऱ्या दारिया कासत्किनाचा 3-6, 6-2, 6-2 असा पराभव करत आगेकूच केली. यावेळी पुढील सामन्यात मारिया साक्‍कारीने 28वे मानांकन असणाऱ्या ऍनेट कॉंटाव्हेटवर 6-4, 6-1 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. तर बीट्रीझ हद्दाद माइआने 31वे मानांकन असणाऱ्या झेंग शुआईवर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात करत आगेकूच केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)