मिथुन चक्रवर्ती उपचारासाठी अमेरिकेतील रुग्णालयात दाखल

मुंबई – बॉलीवूडचे डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांना पाठदुखीचा त्रासामुळे अमेरिकेतील लॉस एंजलिसच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मिथुन चक्रवर्ती पाठदुखीच्या आजाराने त्रस्त होते. साल 2009 मध्ये लकी चित्रपटातील शूटिंग दरम्यान मिथुन चक्रवर्तींना दुखापत झाली. त्यावेळी पाठदुखीवर उपचार करण्यासाठी ते अमेरिकेतील रुग्णालयात दाखल झाले होते. उपचारासाठी त्यांनी एक मोठा ब्रेक घेतला होता. 2018 साली डान्स इंडिया डान्स या रियालिटी शोमध्ये जज होते. यानंतर त्यांना पाठदुखीचा त्रास जास्त होऊ लागल्याने त्यांनी काम करणेही सोडले आहे. सध्या मिथुन यांच्यासोबत मुलगा महाअक्षय चक्रवर्ती आणि सून मदालासा शर्माही अमेरिकेत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)