मिथिला वराडे-डाहाके “मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टंस 2018′ च्या अंतिम फेरीत

स्त्री ही तलवारीची धार असते’, जिजाऊंनी दिलेली ही शिकवण जोपासत नागपूरची मिथिला वराडे-डाहाके हिने “मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टंस 2018′ च्या अंतिम फेरीमध्ये संपूर्ण देश-विदेशातून हजारो महिलांना मागे टाकत सहभागींमध्ये स्वतःचे स्थान बळकावले. मॉडेलिंग या क्षेत्रात तिला आवड असूनही लग्नाअगोदर समाज काय म्हणेल या भितीने एम.बी.ए.(एच आर अँड फायनान्स) या शाखेत पदव्युत्तर पदवी पूर्ण करून गेले सात वर्ष मिथिला एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मानव संसाधन(Human Resource) डिपार्टमेंटमध्ये recruitment Executive पदावर कार्यरत आहे.

मिथिलाचे वडील महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित, कोरडी येथे सहायक लेखापाल, आई शिक्षिका आणि बहीण इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर असून मिथिलाचे लग्न एचडीएफसी बॅंक पुणे येथील शाखा प्रबंधक पदावर कार्यरत असलेले नितेश डाहाके यांच्याशी साली झाला. अडीच वर्षांची मुलगी असताना घर, संसार आणि करिअर एकत्र सांभाळून तिने ध्येयाला दूर न ठेवता अतिशय जिद्दीने ‘मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टंस 2018’ या स्पर्धेत सहभाग घेतला. आता नागपूर, पुणे या दोन्ही शहरांचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी मिथिला करत आहे.

मिथिलाच्या मते ‘स्त्री’ एक शक्तिशाली व्यक्तित्व आहे आणि ते प्रत्येक स्त्रीने आत्मसात करावे. गृहिणी, व्यवसायिका, आई, सून अश्‍या अनेक जबाबदाऱ्या सांभाळून एक स्त्री स्वतःच्या कर्तृत्वाने यशस्वी होते. अर्थातच या सगळ्या जबादाऱ्या पार पाडताना कुटुंबाची साथ असणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)