मित्रानेच केला विनयभंग

पिंपरी – मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणीला तिच्या मित्रानेच मारहाण करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ही घटना बुधवारी (दि. 9) दुपारी दीडच्या सुमारास पिंपळे निलख येथील बागेत घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभि दिलीप सपकाळ (वय-34, रा. थेरगाव) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीडित तरुणी मैत्रिणीला पिंपळे निलख येथील बागेत भेटण्यासाठी गेली होती. यावेळी त्यांचा मित्र अभि सपकाळ देखील तेथे होता. त्याने तिला जवळ ओढून घेत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अश्‍लिल चाळे करुन तिचा विनयभंग केला. इतकेच नाही तर तिचा फोटो काढून व्हायरल करु तसेच तिच्या घरच्यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)