मित्राच्या फसवणुकीने, सावकाराच्या जाचाने शेतकऱ्याची आत्महत्या

File photo

श्रीगोंदे – येथील अनिल कृष्णाजी गाडेकर यांनी सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. गाडेकर यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे आदिक येळकण्या काळे,े(रा. वडाळी), भाऊ बबन कोथिंबिरे (रा. कोथिंबिरेमळा) या दोघांविरुद्ध श्रीगोंदे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
गाडेकर यांनी वडाळी येथील काळे याच्याकडून डिसेंबर 2017 मध्ये घरखर्च व कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये कर्जाने घेतले हगोते. त्यावर महिन्याला पाच टक्‍के व्याज ठरले होते. एक एकर शेतीचे अकरा महिन्यांसाठी गहाणखत करून दिले होते; परंतु काळे हा आठ टक्के एवढ्या वाढीव व्याजदराने गाडेकर यांना पैसे मागत होता. गाडेकर यांनी हे पैसे त्यांचा मित्र भाऊ कोथिंबिरे याला त्याची अडचण असल्यामुळे दिले होते; पण काही दिवसांपासून कोथिंबिरे गावात दिसत नव्हते. त्यांचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे गाडेकर प्रचंड अस्वस्थ झाले होते. गेल्या तीन दिवसांपूर्वी काळे याने गाडेकर यांच्या घरी येऊन, त्यांना तू माझे पैसे दे, नाहीतर मी तुझा जीव घेईन. तू मला ओळखले नाहीस, असे म्हणून शिवीगाळ केली होती. मित्राने पैसे घेऊन केलेली फसवणूक व खासगी सावकाराचा वाढीव व्याजदराने पैसे परत करण्यासाठी लावलेला तगादा या गोष्टीतून मानसिक त्रास झाल्यामुळेच गाडेकर यांनी आत्महत्या केल्याची त्यांच्याजवळ सापडलेल्या चिट्ठीत आढळून आले. अनिल यांचे बंधू गणपत गाडेकर यांनी या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)