नवी दिल्ली: महिला विश्वचषक टी-20 स्पर्धेतील उपान्त्य फेरीतील भारतीय संघाच्या पराभवानंतर मिताली राजला संघातून वगळल्यानंतर सुरू झालेला वाद आता आणखिन विकोपाला गेला असून रमेश पोवार यांनी मिताली राजवर हट्टीपणाचे आणि तिचे न ऐकल्यास निवृत्ती पत्करण्याची धमकी देत असल्याचे आरोप केल्यानंतर मितालीने या आरोपांचे खंडन करताना हा आपल्या आयुष्यातील कळा दिवस असल्याचे म्हणले असून यमुळे वाद आणखिनच वाढला आहे.
महिला विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीतील सामन्यात भारतीय संघाचा इंग्लंड कडून एकतर्फी पराभव झाल्यानंतर संघ निवडी वरुन वाद झाल्यानंतर अनुभवी फलंदाजा मिताली राजने हरमनप्रीत कौर, डायना एडल्जी आणि रमेश पोवारयांच्यावर आरोप केले होते. त्याचे उत्तर देताना रमेश पोवार यांनी मितालीवर काही आरोप केले त्यात ते म्हणाले की, मितालीसोबत माझे तणावपूर्ण संबंध होते. तिला सांभाळणे कठीण आहे. ती फार वेगळ्या प्रकारची खेळाडू आहे. त्याचबरोबर ती सलामीला फलंदाजी करण्याचा हट्ट धरत होती, आणि तसे न झाल्यास निवृत्ती स्विकारण्याची धमकी देत होती असा आरोप रमेश पोवार यांनी केला. तसेच उपान्त्य सामन्यात मितालीला संघातून वगळणे हा पूर्णपणे सांघिक निर्णय होता, यामागे कोणतेही षड्यंत्र नव्हते असेही त्यांनी सांगितले.
यानंतर, मितालीने एक ट्विट करताना आपले मत व्यक्त केले आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले ममीन, मी माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी खेळले, कठोर परिश्रम घेतले, पण माझ्यावर असे आरोप झाल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. या आरोपांमुळे माझी कारकीर्द व्यर्थ गेली आहे, माझ्या देशभक्तीवर संशय घेण्यात येत आहे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात अंधारमय दिवस आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा