मितालीने मानले टीमसह चाहत्यांचे आभार

पुणे – भारतीय महिला संघाची कर्णधार आणि आक्रमक फलंदाज मिताली राजने सर्व महिला टीमसह क्रिडा चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी दिलेल्या सपोर्ट आणि प्रेमामुळे टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचला आहे. हेच प्रेम आणि सपोर्ट कायम असू द्या असे ट्‌विट मितालीने केले आहे.

मिताली राजने सध्या सुरू असलेल्या महिला विश्‍वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्याने ती आयसीसीच्या फलंदाजीच्या अव्वल स्थानापासून काही अंतरावरच आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या फलंदाजीच्या क्रमवारीत मिताली दुसऱ्या स्थानी कायम आहे. महिला विश्‍वचषक स्पर्धेतील शनिवारी झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मिताली राजने केलेल्या शतकीय खेळाच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मिताली राजने विश्‍वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात आतापर्यंत एकूण 356 धावा केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)