मिडीयाला मसाला देऊ नका; मोदींची भाजप नेत्यांना जाहीर सूचना

   तुमच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा होतेय मलिन

नवी दिल्ली – वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून भाजपला अडचणीत आणणाऱ्या पक्ष सहकार्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर कानपिचक्‍या दिल्या आहेत. आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे बोलताना ते म्हणाले की तुम्ही लोक समोर कॅमेरा दिसला की बोलायला लागता. समाज शास्त्रज्ञ असल्याच्या थाटात कोणत्याही विषयावर तुम्ही अर्धवट भाष्य करता त्यातून मिडीयाला मसाला मिळतो आणि त्यातून पक्षाची प्रतिमा खराब होते त्यामुळे अशा वक्तव्यांपासून स्वताला कटाक्षाने दूर ठेवा अशी सुचना मोदींनी आपल्या पक्ष सहकाऱ्यांना दिली आहे.

दहशतवाद आणि बलात्कारापासून ते महाभारत आणि डार्विनच्या थिअरी पर्यंतच्या विविध विषयांवर भाजप नेत्यांनी अलिकडच्या काळात वादग्रस्त वक्तव्ये करून वादंग निर्माण केले आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा संदेश प्रसारीत केला आहे. देशात लहान मुलींवर बलात्कार आणि त्यांची हत्या होण्याचे असंख्य प्रकार घडले आहेत. त्यावरून देशात तणावपुर्ण वातावरण असतानाच भाजपच्या नेत्यांनी याविषयी वादग्रस्त वक्तव्ये करून पक्षापुढे नाहक अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. आजच एक केंद्रीय मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी एवढ्या मोठ्या देशात बलात्काराच्या एकदोन घटना घडल्या तर त्यावरून एवढा गहजब करण्याचे कारण नाहीं असे वक्तव्य केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे. मोदींनी गेल्याच वर्षी पक्षाच्या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर दिलेल्या संदेशात पक्षातील नेत्यांनी आर्ट ऑफ सायलेन्स शिकुन घेण्याची गरज व्यक्त केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)