मिझोरामच्या जेरेमीने भारताला जिंकून दिले पहिले सुवर्ण 

मेहूली घोषला नेमबाजीत रौप्य 
ब्युनोस आयरिस: युवा जागतिक आणि युवा राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे रौप्यपदक व सुवर्णपदक जिंकणाऱ्या जेरेमी लालरीनुंगाने भारताला यंदाच्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावून दिले. मिझोरमच्या या 15 वर्षीय वेटलिफ्टिंगपटूने त्याचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले. 64 किलो वजनी गटात त्याने एकूण 274 किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले आहे. यापूर्वी वर्ल्ड युथ स्पर्धेत जेरमीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. तर, भारताच्या मेहूली घोष हिने नेमबाजी या प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. मेहूलीने 10 मीटर एअर-रायफल नेमबाजीचा महिला गटात सोमवारी ही उल्लेखनीय कामगिरी केली. डेन्मार्कच्या स्टेफनी गृन्डसोयी हिने या प्रकारात अव्वल कामगिरी केली आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
युवा जेरमीने एकूण 274 किलो (124 किलो+150 किलो) वजन उचलले. या स्पर्धेत दुसऱ्या स्थानर राहिलेल्या तुर्कीच्या टॉपटस कानेरने 263 किलो तर तिसऱ्या स्थानावरील कोलंबियाच्या विलर एस्टिवनने 260 किलो वजन उटलले. जेरेमी लालरिनुंगाच्या सुवर्णपदकासह युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात चार पदके झाली आहेत.
तर, नेमबाजीच्या अंतिम फेरीत मेहूलीने अत्यंत चांगली सुरुवात केली होती. आधीचे नेम हे 10 गुणांच्या पट्ट्यात लागले होते. मात्र, ऐन मोक्‍याच्या क्षणी तिचा शेवटचा नेम 10 गुणांच्या पत्त्याचा वेध घेऊ शकला नाही. तिचा 24 वा नेम तिला केवळ 9.1 गुण कमावून देऊ शकला. आणि हाच नेम निर्णायक ठरला. तिची एकूण गुणांची बेरीज 248.0 इतकी झाली. केवळ 0.7 गुणांनी तिचे सुवर्णपदक हुकले. डेन्मार्कच्या स्टेफनीने एकूण 25 संधीमध्ये 248.7 गुण कमावत सुवर्णपदक पटकावले.
विशेष म्हणजे या स्पर्धेत या क्रीडाप्रकारात भारताला अद्याप एकही सुवर्णपदक मिळालेले नाही. मेहुलीच्या रूपाने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवण्याची संधी होती. पण तिची “सुवर्ण’संधी हुकली. तत्पूर्वी, रविवारीदेखील भारताला एक रौप्यपदक मिळाले होते. 44 किलो वजनी गटात ताबाबीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवत भारतासाठी पदक निश्‍चीत केले होते. अंतिम फेरीत तिला व्हेनेझ्युएलाच्या मारिया गिमेन्झकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)