मिचेल स्टार्क आयपीएलमधून बाहेर जाण्याची शक्यता

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला गंभीर दुखापत झाली आहे. स्टार्कला गंभीर दुखापत झाली असल्याने तो आयपीएलमध्ये खेळू शकेल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, मिचल स्टार्कच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ज्यामुळे द. आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज चॅड सेयर्सला स्थान देण्यात आले आहे. जर स्टार्कची दुखापत आणखी बळावली तर तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे केकेआरला मोठा धक्का बसू शकतो.

दरम्यान, बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळेलल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट यांना आयपीएल मधून बाहेर काढण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)