मिचेल स्टार्कला केकेआर संघातून डच्चू

केवळ एक टेक्‍स्ट मेसेज करुन दिली सुचना 
सिडनी, दि. 15 – ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्स संघातून डच्चू दिला गेला असून आगामी मोसमात तो केकेआर संघाचा हिस्सा नसणार आहे. याची माहिती कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला केवळ एक टेक्‍स्ट मेसेज करून करारातून मुक्त केले आहे. अशी माहिती ऑस्ट्रलियात पत्रकारांशी संवाद साधताना स्टार्कने दिली आहे.

स्टार्कला कोलकाताच्या संघाने मागिल मोसमात 1.8 मिलियन डॉलर्स एवढी तगडी किंमत देऊन खरेदी केले होते. पण एका मेसेजच्या माध्यमातून मला करारातून मुक्त करण्यात आले असल्याने मला धक्‍का बसला असेही त्याने यावेळी त्याने सांगितले. संघाच्या मालकांकडून मला केवळ एक टेक्‍स्ट मेसेज आला. त्यात मी आता संघात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता आगामी आयपीएलच्या मोसमात मी नसणार आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे मला खेळता आले नव्हते. यावेळी जर मी खेळलो असतो, तर मला माझी तंदुरुस्ती सिद्ध करता आली असती. सध्या एक किरकोळ दुखापत वगळता मी संपुर्णपने तंदुरुस्त आहे. असेही त्याने यावेळी सांगितले.

-Ads-

तसेच यावेळी बोलताना तो पुढे म्हणाला की, पुढच्या वर्षी जर मी कोणत्याही संघाकडून आयपीएलमध्ये सहभागी नसेल. तर, इंग्लंडमध्ये होणाऱ्या काऊंटी क्रिकेट मध्ये मी सहा महिने नक्कीच खेळू शकेल, त्याचा फायदा निश्‍चीतच मला ऑस्ट्रेलियासंघाकडून कसोटी क्रिकेटसाठी होईल. असेही तो यावेळी म्हणाला. सध्या मला ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून शक्‍य तेवढे कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. असेही त्याने यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
16 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
1 :cry: Sad
35 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)