मिकून वादळ शमल्याने लवकरच पावासाची शक्‍यता – बी. एन. शिंदे

शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठेवून ओलीसाठी उताराला आडव्या मशागती कराव्यात
नगर – मिकून वादळ आज शमल्याने त्याने ओढलेले बाष्प मुक्‍त होऊन उद्या दक्षिण महाराष्ट्रातून पावसाचे आगमन होऊन दोन ते तीन दिवसांत तो दक्षिण कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा व्यापण्याची शक्‍यता आहे. हा पाऊस अनेक ठिकाणी कमी जास्त होऊन काही ठिकाणी वादळ, विजा व तुरळक ठिकाणी गाराही पडण्याची शक्‍यता असल्याने शेतमाल झाकून पाणी जिरवण्यास उताराला आडव्या पूर्व मशागती करून ठेवाव्यात, असे आवाहन बी. एन. शिंदे यांनी शेतकऱ्यांना प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.
गेल्या आठवड्यातच दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले होते. पण, चार ते पाच दिवसांपूर्वी अरबी समुद्रात मिकून वादळ तयार होऊन ते प्रथम आफ्रिकेकडे व नंतर ओमानकडे गेल्याने महाराष्ट्रातील ढग तिकडे खेचले होते. उत्तर भारतातील तप्त हवा महाराष्ट्राकडे ओढल्याने येथे उष्णतेची तीव्र लाट आली; पण आज ते वादळ ओमानकडे सरकताना शमल्याने कालपासूनच तिकडे जाणारे ढग मुक्‍त झाले आहे. महाराष्ट्रात तापमान खूपच वाढल्याने, तसेच पूर्वभारतही पावसाने थंड झाल्याने येथेच कमी भार तयार होऊन बाष्पयुक्‍त वारे महाराष्ट्राकडे येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आज रात्रीपासूनच दक्षिण महाराष्ट्रातून मान्सूनपूर्व वादळी पावसाला सुरुवात होऊन 2 ते 3 दिवसात तो दक्षिण कोकणसह मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व्यापण्याची शक्‍यता आहे. त्याने येथील सर्व ठिकाणचे तापमान झपाट्याने उतरून बहुतांशी ठिकाणी वादळी पाऊस, विजा व तुरळक ठिकाणी गाराही पडणार असल्याने शेतकऱ्यांनी काढणीला आलेली आंबा, कलिंगड, खरबुजासारखी फळे तोडून सुरक्षित ठेवावीत. भुईमूग व कांद्याची काढणी थांबवून काढलेला कांदा व भुईमूग झाकून ठेवावा. शेताच्या उताराला आडव्या मशागती करून ठेवाव्यात म्हणजे पावसाचे पाणी त्यात जिरून खरिपासाठी ओल लवकर होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)