मिकी आर्थर हे मुर्ख आणि गाढव : मोहसीन खान 

इस्लामाबाद: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख असलेल्या मोहसीन खान यांनी पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांना मूर्ख आणि गाढव असे संबोधल्याने पाकिस्तान क्रिकेट मध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे. ऑर्थर यांनीही हे विधान गांभीर्याने घेतले असून जोपर्यंत मोहसीन खान त्यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत ते क्रिकेट बोर्डाच्या कोणत्याही बैठकीला हजर राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपुर्वी प्रशिक्षक मिकी आर्थर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे प्रमुख इंझमाम-उल-हक यांच्यातही वाद झाला होता. या दोघांमध्ये संघ निवडी दरम्यान काही खेळाडूंच्या निवडीवरून मोठा वाद झाला होता. मोहम्मद हाफिजने संघात पुनरागमन करावे, अशी इंझमाम यांची यावेळी इच्छा होती. मात्र, मिकी आर्थर यांचा हाफिजच्या नावाला विरोध होता. यावरून दोघांमध्ये खटके उडाले होते. त्यानंतर आता मोहम्मद आमीरच्या निवडीवरून खान आणि आर्थर यांच्यात वाजले आहे.

मोहसीन खान यांची नुकतीच क्रिकेट प्रशासकीय समितीच्या प्रमुखपदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये मोहसीन खान यांच्यासह वासिम अक्रम, माजी कर्णधार मिसबाह-उल-हक व महिला संघाच्या माजी कर्णधार उरूज मुमताज यांनाही स्थान देण्यात आले आहे. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांच्यावर देखरेख ठेवून त्यांना योग्य सल्ला देण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. 2019 च्या विश्‍वचषकापर्यंत मिकी आर्थर यांना क्रिकेट बोर्डाने मुदतवाढही दिली आहे. परंतु, मोहसीन खान हे कोअर कमिटीचे अध्यक्ष बनल्यापासून वादग्रस्त विधाने करीत असल्याने पीसीबीसाठी ही नवी डोकेदुखी बनली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)