माॅडर्नमध्ये श्रावण गीत-नृत्‍यांचा आनंद

निगडी – पारंपरिक वेशभूषेतील महिला, त्यांनी सादर केलेल्या विविध फुगड्या, तांदूळ सडू खेळ, केरसुणी, जात, अडवळ घुम, भोवर भेंडी, नाच ग घुमा, तवा कमळ अशा पारंपरिक खेळात मुली रममाण झाल्या. वर्षानुवर्षे चालत आलेल्या आणि सध्याच्या धावपळीच्या जीवनात हरवून जात असलेली आपली पारंपरिक श्रावणी गीते आणि नृत्यांचा आनंद आणि अनुभव घेण्याची संधी मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळाली. मॉडर्न हायस्कूल आणि श्रावणी महिला सखी मंचने श्रावणी शुक्रवार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महिलांनी भारतीय संस्कृतीतील पारंपरिक मंगळागौर खेळ सादर करून मुलींची मने जिंकली. प्रथम सरस्वती देवीचे पूजन करून देवीचा जागर करण्यात आला. शिक्षिका मीना अधिकारी यांनी श्रावणी शुक्रवारनिमित्त आधुनिक गोष्ट सांगून या सणाचे महत्त्व सांगितले. झिम्मा, फुगडीच्या विविध खेळांतून महिलांची प्रकृती कशी उत्तम राहू शकते, याबद्दल माहिती दिली. पारंपरिक खेळातील गाण्यातून समाज प्रबोधन करण्यासाठी “मुलींना शिकवा-मुलींना जगवा’, “प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्या वापरा’, “झाडे लावा-झाडे जगवा’, “शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा’ या विषयांवर जनजागृती केली.
श्रावणी सख्यांच्या विविध खेळातून संघ प्रवृत्तीचे महत्त्व, परस्पर मैत्री भावाचे महत्त्व विद्यार्थींनींनी समजून घेतले. यापुढे आपला सांस्कृतिक वारसा पुढील पिढीला देण्यासाठी असे कार्यक्रम करू, असे मंचच्या प्रमुख अनिता शर्मा यांनी सांगितले. मॉडर्न हायस्कूलच्या पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, पालक संघाच्या उपाध्यक्षा रेखा धामणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सविता नाईकरे यावेळी उपस्थित होत्या. सुजाता ठोंबरे यांनी सूत्रसंचालन व मनीषा बोत्रे यांनी आभार मानले. प्राचार्य सतीश गवळी, संस्था उपकार्यवाह शरद इनामदार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)