माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

कामशेत, (वार्ताहर) – कामशेत परिसरातील येवलेवाडी येथे राहणाऱ्या एका विवाहीत महिलेला मागील दीड वर्षांपासून घर खर्चासाठी व चार चाकीसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण करून शारीरिक छळ करणाऱ्या नवरा व सासरा यांच्या विरोधात महिलेने तक्रार कामशेत पोलीस ठाण्यात दाखल केली.

25 एप्रिल 2003 पासून ते आजपर्यंत गेली दीड वर्षांपासून घर खर्च व चार चाकीसाठी माहेरून पैसे आणावे या कारणाने वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून उपाशीपोटी ठेऊन व घरातून हकलून देऊन शारीरिक व मानसिक छळ करून पैसे न आणल्यास तुला नांदवणार नाही, असे सांगून नवरा व सासऱ्याने गळ्यातील दागिने काढून घेऊन घरातून हाकलून दिल्याची तक्रार या महिलेने केली आहे, अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली.

या प्रकरणी पोलीस हवालदार डावकर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)