उरुळी कांचन – माहेरहून विविध कारणांसाठी पैशांची मागणी करून सुनेचा छळ करणाऱ्या पतीवर आणि तिच्या सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची घटना शुक्रवार (दि. 13) लोणी काळभोर पोलीस चौकी क्षेत्रात घडली. याबाबतची माहिती अशी की, अनुजा नीलेश कांचन (वय 24, रा. स्वरगंधार सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
अनुजा आणि नीलेश जयसिंग कांचन यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला. या विवाहावेळी अनुजाच्या वडिलांनी सुमारे 25 लाखांचा खर्च केला होता. सुरुवातीचे दोन-तीन महिने चांगले गेले. मात्र, त्यानंतर अनुजाची सासू नलिनी जयसिंग कांचन आणि सासरे जयसिंग बाबूराव कांचन आणि विणा बाळासाहेब परदेशी (शेजारी) (सर्व रा. स्वरगंधार सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी विविध कारणांसाठी अनुजाकडे पैशांची मागणी सुरू करून तिच्या छळास सुरुवात केली. नीलेश कांचन हा बेरोजगार होता. त्याला हॉटेलचा व्यवसाय सुरू करावयाचा होता आणि त्यासाठी त्याने अनुजाकडे माहेरहून हे पैसे आणण्याची मागणी केली. त्यानुसार अनुजानाच्या वडिलांनी शेती विकून 6 लाखांचा चेक आणि चार लाख रोक अशी रक्कम नीलेश कांचनकडे आणून दिली. मात्र मंगळवारी (दि. 3) नीलेश दारू पिऊन आला आणि त्याने अनुजाला मारहाण करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच त्याने आणि अनुजाच्या सासू-सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढले. यानंतर वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र चांदणे करीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा