“माहेर’तर्फे ऊसतोड कामगारांना कपडे वाटप

शिक्रापूर- वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील माहेर संस्थेच्या वतीने समाजातील दुर्लक्षित ऊसतोड कामगारांसोबत ख्रिसमस साजरा करण्यात आला आहे. परिसरातील शंभरहून अधिक ऊस तोड कामगारांच्या कुटुंबीयांच्यासमवेत स्नेहभोजन पार पडले. यावेळी त्यांना कपडे व विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी सर्व ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना साडी, चादर, कपडे, खेळणी वाटप करण्यात आले. माहेर संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा लुसी कुरियन यांनी सांगितले की, समाजातील तळागाळातील लोकांनी यामध्ये सहभागी झाले पाहिजे, असा संदेश येशुंनी दिला होता. ऊसतोडणी कामगारांचा दिवस गोड व्हावा या हेतूने हा सण साजरा करीत आहे. यावेळी बाल येशूची मेणबत्ती हातामध्ये घेत सर्व मुलांनी प्रार्थना केली. यावेळी अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, उद्योजक कवी मयूर करंजे, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कालमबटे, डॉ. आशियाना इनामदार, डॉ. स्नेहल कोल्हे, मधुसूदन शिंदे उपस्थित होते. यावेळी उसतोड कामगारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. माहेर संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांसह ऊसतोड कामगारांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक कवी मयूर करंजे यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे यांनी केले. वैभव पवार यांनी प्रास्ताविक केले. मंगेश पोळ यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)