शिक्रापूर- वढू बुद्रुक येथील माहेर संस्थेच्या वतीने नेहमी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यातच माहेर संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी गावामध्ये असलेल्या छत्रपती संभाजीमहाराज यांच्या समाधीस्थळासोबत गावातील परिसराची स्वच्छता करून ग्रामस्थ आणि नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील अनाथांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेच्या संस्थापिका समाजसेविका सिस्टर लुसि कुरियन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माहेर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबीर तसेच स्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी माहेर संस्थेतील पदाधिकारी आणि अनेक 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर रविवारी सकाळी माहेर संस्थेच्या 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी गावातून स्वच्छता रॅली काढली. छत्रपती संभाजीमहाराज तसेच गोविंद गोपाळ यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून दोन्ही समाधीस्थळांचा तसेच गावातील संपूर्ण परिसर स्वच्छता केला. यावेळी रॅली दरम्यान मुलांनी “माझं घर, स्वच्छ घर’, “माझं गाव स्वच्छ गाव’, “माझा देश, स्वच्छ देश’ अशा घोषणा देऊन स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमामध्ये लुसि कुरियन, माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, व्यवस्थापक रमेश दुतोंडे, वैभव पवार, आनंद सागर आदींनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)