माहूर येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन

गराडे- पुरंदर तालुक्‍यातील माहूर येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पंचायत समिती सदस्य अर्चना जाधव, शिवाजी कोलते, परिंचे सरपंच समीर जाधव, तंटामुक्‍ती अध्यक्ष शरद जगताप, उपसरपंच सुशिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने माहूर गावातील नवीन स्मशानभूमी शेड अंतर्गत सिमेंट क्रॉंक्रिट रोड, स्मशानभूमीत प्लेविंग बॉक्‍स बसवणे या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन जगताप, पंढरी जगताप, हनुमंत जगताप, अनिल जगताप, प्रमोद जगताप, देवदत्त जगताप, पद्‌माकर जगताप, प्रीतम भोसले, निरंजन चव्हाण, अरविंद चव्हाण, नारायण जगताप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

माहूर गावातील नवीन स्मशानभूमी शेडसाठी दिलीप यादव यांच्या प्रयत्नातून 5 लाख 60 हजार रूपये तसेच दिलीप यादव यांच्या जिल्हा परिषद फंडातून माहूर गाव अंतर्गत सिमेंट क्रॉंक्रिट रोडसाठी 3 लक्ष रूपये आणि स्मशानभूमीत प्लेविंग बॉक्‍स बसवणे यासाठी 2 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती उपसरपंच सुशिल चव्हाण यांनी दिली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)