माहुली येथे सामूहिक माती स्नान उत्साहात

सातारा ः माहुली येथे माती स्नानासाठी सहभागी झालेले नागरिक.

सातारा, दि. 11 (प्रतिनिधी)-11 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण देशभरात निसर्गोपचारांचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज सर्वत्र सामूहिक माती स्नान करण्यात आले.सकाळी दहा वाजता क्षेत्र माहुली येथे कृष्णा नदीच्या तीरावर सातारच्या ओंकार निसर्गोपचार केंद्राच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती आयएनओ सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ. रविंद्र भरती- झुटींग यांनी दिली. आयएनओ पश्‍चिम महाराष्ट्र कॉर्डिनेटर डॉ. पल्लवी दळवी, जिल्हा परिषदेचे श्रीकांत ताडे, डॉ. स्वाती राजे, राजेंद्र नवले यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी निसर्गोपचार तज्ञ डॉ. स्वाती राजे यांनी माती स्नानाचे महत्त्व सांगितले. विशिष्ट पध्द्‌तीने माती तयार करून माती स्नानासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. सर्व सहभागींनी माती स्नानाचा आनंद घेतला. माती स्नानानंतर अर्धा तास सूर्यस्नान झाले. त्यानंतर नदीत जलस्नान करण्यात आली. देशात सर्वच राज्यात एकाच वेळी हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाचे लाईव्ह व्हिडीओ शूटिंग केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठवण्यात आले आहे. सर्व सहभागी व्यक्तींना वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळणार आहे. जिल्ह्यात प्रथमच झालेल्या वर्ल्ड रेकॉर्ड माती स्नानाचे सर्वांनी अभिनंदन केले. 100 पेक्षा जास्त लोक या उपक्रमात सहभागी झाले. यावेळी गोळीबार मैदान सातारा येथील यशोदा निसर्गोपचार केंद्र येथे अनिल महामुनी यांनी ही हा उपक्रम राबवला.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)