माहिती अधिकार कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा

देऊळगाव राजे- बोरिबेल (ता. दौंड) हद्दीत एका वाळूने भरलेल्या ट्रकमधील वाळूसह पाच हजार रोख लुटल्याप्रकरणी आणि ट्रकचालकला मारहाण केल्यामुळे एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर खंडणी आणि लूटमार केल्याचा गुन्हा दौंड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
अंबादास छबु शेळके (रा. देऊळगाव राजे, ता. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा गाडी चालक दत्तात्रय निवृत्ती दिवार (रा. देऊळगाव राजे) हा ट्रक (क्र. एमएच 42 एएफ 8109) मध्ये करमाळा येथे वाळू भरून सिद्धटेक बोरिबेलमार्गे रावणगाव येथे जात असताना सोमवारी (दि. 23) सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी संदीप वामन लगड (रा. बोरिबेल, शिंगाडेवाडी, लगडवस्ती, ता. दौंड, जि. पुणे) याने बोरिबेल हद्दीत ट्रक अडविला आणि गाडीतून ड्रायव्हर दत्तात्रय याला उतरवून धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली, तसेच ड्रायव्हरच्या खिशातून रोख पाच हजार रुपये काढून घेतले, त्यानंतर घडला प्रकार ड्रायव्हर दत्तात्रय याने गाडीमालक आणि फिर्यादी अंबादास शेळके यांना सांगितला. त्यानंतर ते बोरिबेल येथे गेले असता आरोपी संदीप लगड याने फिर्यादीकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. तसे नाही केले तर वाळूची गाडी खाली करण्याची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी अंबादास शेळके यांनी भीतीपोटी 3 ब्रास वाळू तेथेच खाली केली. आरोपी संदीप वामन लगड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तू रोटे यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)