माहिती अधिकाराला पालिकेचा हरताळ

संकेतस्थळावर अत्यावश्‍यक माहितीच नाही


90 टक्‍के विभागांकडून माहिती सादर करण्याकडे दुर्लक्ष

पुणे : “माहिती अधिकार अधिनियम 2005′ च्या कलम 4 नुसार महापालिकेच्या संकेतस्थळावर बंधनकारक असलेली माहिती जाहीर करण्यास महापालिका प्रशासनाने हरताळ फासला आहे. या कायद्यानुसार, प्रत्येक वर्षी 1 जानेवारी व 1 जुलै रोजी संकेतस्थळावरील सर्व विभागांची माहिती अद्ययावत करणे आवश्‍यक असताना पालिकेच्या केवळ चार ते पाच विभागांनीच अद्ययावत माहिती जाहीर केली आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावर पालिकेशी संबंधित सर्व माहिती आहे. या संकेतस्थळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेकडून गेल्या काही वर्षांत तब्बल 5 कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आलेला असला तरी, हे संकेतस्थळ अद्यापही अर्धवटच आहे. त्यातच या संकेतस्थळावर माहिती अधिकार कायद्यांतर्गत जाहीर करणे बंधनकारक असलेली माहितीही टाकली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वेळोवेळी स्वयंसेवी संस्थांकडून ही माहिती जाहीर करण्याबाबत पालिकेस पत्र पाठविण्यात आलेली आहेत. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार, महापालिकेने अजूनही संकेतस्थळ अद्ययावत केलेले नाही. परिमंडळ क्रमांक दोन, चार, अस्थापना विभाग तसेच उपायुक्‍त (झोनीपू) विभाग वगळता कोणत्याही विभागाने अद्याप ही माहिती जाहीर केलेली नाही. त्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी स्वत: आदेश दिलेले आहेत. मात्र, विभाग प्रमुखांकडून आयुक्‍तांच्या आदेशालाही हरताळ फासला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयुक्‍तांकडे अहवाल सादर करणार
दरम्यान, ज्या विभागांनी माहिती सादर केलेली नाही. त्या विभागांचा अहवाल महापालिका आयुक्‍तांना सादर केला जाणार आहे. ही माहिती एकत्रित करून ती संकेतस्थळावर सादर करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्‍तांनी उपायुक्‍त झोनिपू विभागास दिली आहे. त्यानुसार, माहिती न देणाऱ्या विभागांचा अहवाल झोनिपू विभाग आयुक्‍तांना सादर केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)